Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दक्षिण भारत पुन्हा हादरला! व्यंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा मृत्यू

दक्षिण भारत पुन्हा हादरला! व्यंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा मृत्यू

Andhra Pradesh Temple Stampede: दक्षिण भारत पुन्हा चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे हादरला आहे. आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील व्यंकटेश्वर मंदिरात शनिवारी सकाळी भाविकांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यात नऊ भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय, अनेक भाविक जखमी झाल्याच सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच तमिळनाडू आणि बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

शनिवारी व्यंकटेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असतेच. त्यातच एकादशी असल्याचे गर्दी आणखी वाढली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये गोंधळ उडाला. यामुळे चेंगराचेंगरी झाली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेनंतर तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी एक्सवर याबाबत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “या दुःखद घटनेत भाविकांचा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो. जखमींना जलद आणि योग्य उपचार मिळावेत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य आणि इतर उपाययोजनांवर देखरेख करण्याची विनंती केली आहे.”

काशिबुग्गा व्यंकटेश्वर मंदिर हे 12 एकरवर पसरलेले आहे. दूरदूरून भाविक याठिकाणी दर्शनाला येत असतात. चेंगराचेंगरीनंतर मंदिर परिसरात अनेक भाविक जमिनीवर निपचित पडल्याचे दिसले. इतर भाविकांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. तसेच उपचारासाठी तातडीने रुग्णालयात त्यांना हलवले.

अभिनेता विजयच्या रॅलीत झाली होती चेंगराचेंगरी

अभिनेता आणि आता राजकीय पक्षाचा नेता झालेल्या थलपती विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन 41 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनीच आता आंध्रात ही दुःखद घटना घडली आहे.

वर्षभरातील तिसरी घटना

व्यकंटेश्वर मंदिरात झालेली चेंगराचेंगरीची घटना या वर्षातील राज्यातील तिसरी घटना आहे. 30 एप्रिल रोजी विशाखापट्टणम येथील सिंहचलम मंदिरात पावसामुळे भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. 8 जानेवारी रोजी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे तिरुमला येथील भगवान वेंकटेश्वर मंदिराच्या विशेष दर्शनासाठी तिकिटे वाटप करण्यासाठी काउंटवर झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन सहा जणांचा मृत्यू झाला होता.

आरसीबीच्या सत्कार सोहळ्यादरम्यान चेंगराचेंगरी

इंडियन प्रीमियर लीग’चे (आयपीएल) जेतेपद पटकावल्यानंतर जून महिन्यात ‘आरसीबी’ संघातील खेळाडूंच्या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने चिन्नास्वामी क्रीडांगणात केले होते. या वेळी क्रीडांगणाबाहेर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. यादरम्यान चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आणि 56 जण जखमी झाले.

पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला

आंध्र प्रदेशमधील व्यंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर मोदींनी दुःख व्यक्त केले. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या वारशांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!