Today सोमवार, 28th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबई विमानतळावर भीषण अपघात; २५ फूट उंचीवरून पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई विमानतळावर भीषण अपघात; २५ फूट उंचीवरून पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या एका दुर्दैवी घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कन्व्हेयर बेल्ट तपासणीदरम्यान ३० वर्षीय कर्मचाऱ्याचा २५ फूट उंचीवरून खाली पडून मृत्यू झाला. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी दुपारी घडली असून मृत कर्मचाऱ्याचे नाव दुर्गेश पांडे असे आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गेश पांडे हे अंधेरी पूर्वेतील रहिवासी असून ते विमानतळावर कार्यरत प्रभात असोसिएट्स या कंपनीत टेक्निकल सुपरवायझर म्हणून काम करत होते. अपघाताच्या दिवशी ते आपल्या सहकाऱ्यासह कन्व्हेयर बेल्ट तपासणीचे काम करत होते. त्यासाठी ते लेव्हल २ वरील फॉल्स सीलिंगवर गेले होते. तपासणीदरम्यान त्यांचा तोल गेल्याने ते सुमारे २५ फूट खाली कोसळले.

या अपघातात दुर्गेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ विले पार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले तरी दुखापत गंभीर असल्याने त्यांना वाचवता आलं नाही.

या घटनेनंतर सहारा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. विमानतळावर सुरक्षेच्या नियमांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!