Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कोल्हापूरात काँग्रेसला जबर धक्का; भाजपनं बडा नेता फोडला, चंदगडच्या राजकारणात खळबळ

कोल्हापूरात काँग्रेसला जबर धक्का; भाजपनं बडा नेता फोडला, चंदगडच्या राजकारणात खळबळ

कोल्हापूर : जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. काँग्रेसला जबर धक्का देत विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला असून, चंदगड मतदारसंघात राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत.

विनायक पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार शिवाजी पाटील यांची भेट घेतली होती. आता ते १ नोव्हेंबर रोजी मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत औपचारिकरित्या भाजपात प्रवेश करणार आहेत.

विनायक पाटील यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय राजकारणात आपली भूमिका मजबूत केली होती. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.

या पक्षप्रवेशात विनायक पाटील यांच्यासोबत महागावचे सरपंच प्रशांत शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खमलेटी, श्रीशैल पाटील आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या घडामोडीमुळे चंदगड आणि कोल्हापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे आणि काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!