Today शनिवार, 19th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया, पुढील काही दिवस विश्रांती घेण्याच्या डॉक्टरांचा सल्ला

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया, पुढील काही दिवस विश्रांती घेण्याच्या डॉक्टरांचा सल्ला

मुंबई : राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला भुजबळांना देण्यात आला आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही. त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या कार्यात पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळांना प्रकृतीच्या अडचणी येत होत्या. सातत्याने होत असलेले मेळावे आणि दौरे यांच्यामुळे त्यांची दगदग वाढली होती. त्यामुळेच त्यांची प्रकृतीही खालावली होती.

गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला छगन भुजबळांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांना थकवा जाणवत असल्याने जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

सध्या भुजबळांची प्रकृती स्थिर असून काही दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस ते कुणालाही भेटणार नाहीत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!