पुणे : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी १० नोव्हेंबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, मुंबई येथे क्रीडा प्रशिक्षणार्थी (क्रिकेट आणि कबड्डी) यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : क्रीडा प्रशिक्षणार्थी (क्रिकेट आणि कबड्डी).
– एकूण रिक्त पदे : 10 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई.
– वयोमर्यादा : 18 वर्षे ते 25 वर्षे.
– वेतन / मानधन : दरमहा १५००० रुपये स्टायपेंड.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० नोव्हेंबर २०२५.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्यवस्थापक (मानव संसाधन विकास)/सरचिटणीस, जेके स्पोर्ट्स कौन्सिल, प्रशासन इमारत, शेवा, नवी मुंबई – ४००७०७.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.jnport.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


