Bullock Cart Race: राजकारण आणि कुस्ती दोन्ही क्षेत्रात चर्चेत राहणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुन्हा एकदा चर्चत आले आहेत. शिवसेना (ठाकरे) गट सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्यांनी ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे. आगामी 9 नोव्हेंबर रोजी तासगावजवळ भव्य श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत विजेत्यांसाठी 2 फॉर्च्यूनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि तब्बल 150 दुचाकी अशी बक्षिसांची रांग लावण्यात आली आहे.
राज्यात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक बक्षिसे असलेल्या या स्पर्धेमध्ये ओपन जनरल शर्यत आणि पट्टा पद्धतीची शर्यत घेतली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी ४ ते ५ लाख शेतकरी आणि बैलगाडी मालक सहभागी होतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा –वेदश्री गणेश सुक्रेंचा गाडा घाटाचा राजा; करंदीकरांच्या बैलगाडा शर्यतीत पहिल्या दिवशी धावले 151 गाडे
चंद्रहार पाटील यांनी सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश केवळ स्पर्धा नाही, तर गोवंश संरक्षण आणि पशुसंवर्धनाचा प्रसार करणे आहे. पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देत ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण निर्माण करणे हे आमचं ध्येय आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने आयोजित ही स्पर्धा राज्यभरातील बैलगाडा शर्यतींना नवा आयाम देणारी ठरणार आहे.


