Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बिलासपूरमध्ये मोठा रेल्वे अपघात! लोकल ट्रेन आणि मालगाडीची धडक; 4 जणांचा मृत्यू

बिलासपूरमध्ये मोठा रेल्वे अपघात! लोकल ट्रेन आणि मालगाडीची धडक; 4 जणांचा मृत्यू

Bilaspur Train Accident: छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात सोमवारी दुपारी भीषण रेल्वे अपघात घडला. लालखदान परिसरात प्रवासी लोकल ट्रेन आणि मालगाडीची समोरासमोर टक्कर झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रवासी ट्रेन कोरबाहून बिलासपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. टक्कर एवढी जोरदार होती की, लोकल ट्रेनच्या काही डब्यांचा पूर्णपणे चुराडा झाला.

घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि रेल्वेचे पथक तातडीने पोहोचले असून गॅस कटरच्या सहाय्याने डब्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आग्नेय मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश आणि बिलासपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजमल खोईवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. बिलासपूर जिल्हा प्रशासनाने चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे, तर अनेक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – भयंकर बस अपघात! ओव्हरटेकच्या प्रयत्नात ५० प्रवाशांसह बस दरीत कोसळली; ३ जणांचा मृत्यू

दरम्यान, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, ‘बिलासपूरमधील लालखदान स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. मृतांच्या आत्म्यास शांती आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो. सरकारने जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि जखमींवर योग्य उपचार व्हावेत. स्थानिक प्रशासन आणि रेल्वे अधिकारी बचाव कार्यावर लक्ष ठेवून असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!