Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का..! देशमुख कुटुंब शिंदेंच्या शिवसेनेत; निवडणुकीआधी राष्ट्रवादीत खळबळ

पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का..! देशमुख कुटुंब शिंदेंच्या शिवसेनेत; निवडणुकीआधी राष्ट्रवादीत खळबळ

पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेससाठी (शरद पवार गट) धक्क्यांची मालिका सुरूच आहे. पुण्यातील उत्तर भागात प्रभाव असलेले देशमुख कुटुंब आणि त्यांचे समर्थक शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश गुरुवारी चाकण येथे होणाऱ्या भव्य मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

विधानसभा निवडणुकांनंतर सतत नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आता अतुल देशमुख यांच्या प्रवेशामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात पवार गटाची ताकद कमी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतुल देशमुख, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि हजारो कार्यकर्ते शरद पवारांची साथ सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेणार आहेत. उत्तर पुण्यात देशमुख कुटुंबाचा मोठा प्रभाव असल्याने हा प्रवेश शिंदे गटासाठी मोठं राजकीय बळ मानलं जात आहे.

नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतो. अमोल कोल्हे यांचेही समर्थक असलेल्या देशमुखांनी शरद पवारांपासून दूर जात शिंदे गटात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!