Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bank Job ! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती; कुठंही जायची गरज नाही, घरबसल्या करता येणार अर्ज…

Bank Job ! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती; कुठंही जायची गरज नाही, घरबसल्या करता येणार अर्ज…

पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक अर्थात क्लार्क या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 434 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती आता तुम्हाला मिळू शकणार आहे. त्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : लेखनिक.
– रिक्त पदे : 434 पदे.

– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pdccbank.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!