इंदापूर : राज्य निवडणूक आयोगा ने दि. 4 नोव्हेंबर रोजी नगरपंचायत, नगरपरिषद 2025-2030 सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. इंदापूर नगरपरिपालिकचीही निवडणुक जाहिर झाली असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे( उबाठा) ने ही संभाव्य उमेदवारांची प्रथम यादी जाहिर करुन इंदापूर नगरपालिका निवडणुकीचे रणसिंग फुंकले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय काळे, जिल्हा समन्वयक भीमराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी इंदापूर नगरपरिषद निवडणुकीसाठीची उमेदवारांची यादी (दि. ४ ) रोजी इंदापूर येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर करण्यात आली.शिवसेना ठाकरे पक्ष नगराध्यक्षपदासह सर्वच जागा लढवणार असल्याचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी सांगितले.
उर्वरित प्रभागातील उमेदवारांची दुसरी यादी येत्या दोन दिवसांत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय काळे व तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी सांगितले.
सदरील बैठकीस जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, इंदापूर शहरप्रमुख मे महादेव सोमवंशी, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, तालुका समन्वयक अरुण पवार, युवासेना जिल्हा समन्वयक ॲड राहुल बंडगर, युवासेना तालुकाप्रमुख सचिन इंगळे, महिला तालुका संघटिका राणीताई इंगवले यांच्यासह इंदापूर शहरातील संतोष क्षीरसागर, अविनाश खंडाळे, प्रदीप पवार, दादा देवकर, बंडु शेवाळे, देवा मगर, माऊली चौगुले, योगेश जायभाय इत्यादी पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील सर्व उपतालुकाप्रमुख, सर्व विभागप्रमुख, सर्व उपविभागप्रमुख व शाखाप्रमुख उपस्थित होते.
उबाठा पक्षाचे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठीचे संभाव्य उमेदवार
प्रभाग क्र २ – प्रविण प्रकाश देवकर
प्रभाग क्र ३ – महादेव वसंत सोमवंशी
प्रभाग क्र ५ – बालाजी गुणवंतराव पाटील
प्रभाग क्र ६ – तेजश्री प्रदीप पवार, संतोष मोहन क्षीरसागर
प्रभाग क्र ८ – बंडु पांडुरंग शेवाळे
प्रभाग क्र १०- पुजा श्रीधर खंडाळे, ज्ञानोबा नारायण खंडागळे


