Today शुक्रवार, 18th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shirur: पिंपरखेडनंतर काळेचीवाडीत बिबट्याचा थरार; मांजरीमुळे झोक्यावर बसलेला चिमुकला थोडक्यात बचावला, पहा व्हिडीओ

Shirur: पिंपरखेडनंतर काळेचीवाडीत बिबट्याचा थरार; मांजरीमुळे झोक्यावर बसलेला चिमुकला थोडक्यात बचावला, पहा व्हिडीओ

शिरुर : गेल्या काही महिन्यात पुणे (Pune) जिल्ह्यातील काही तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात लहान मुलांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे, ग्रामस्थांकडून वन विभागावर संताप व्यक्त होत आहे. त्यातच, काळेचीवाडी येथील एका घरातील लहान मुलगा झोक्यावर बसून आनंद घेत होता, तितक्यात मांजरीचा पाठलाग करत बिबट्या थेट घरात शिरल्याचं पाहायला मिळालं. बिबट्याला (leopard) पाहताच चिमुकल्याने घरात जाऊन आई-वडिलांना माहिती दिली, तेवढ्यात बिबट्या पळून गेला. हा सर्व थरार व्हिडिओत कैद झाला आहे.

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या शिवन्या बोंबेचा मृत्यू झाला होता. 22 ऑक्टोबर रोजी भागाबाई रंगनाथ जाधव (वय ७०, मौजे जांबुत, ता. शिरूर) या वृद्ध महिलेचा याच बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी (दि. 1) रोहन विलास बोंबे या 14 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केले होते. मनुष्यवस्तीत सातत्याने नागरिकांवर होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर जीव घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, त्याला यश येत नव्हते. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी आंदोलन करत जाळपोळदेखील केली. अखेर त्या बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलं आहे. मात्र, एकीकडे नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आलं असलं तरी अद्यापही गावात येणाऱ्या बिबट्यांचं प्रमाण काही केल्या कमी झाल्याचं दिसत नाही.

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात नुकताच 14 वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होती, आणि ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला असून, हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे घराच्या अंगणात चिमुकला झोक्यावर खेळत असताना बिबट्या अचानक कुत्र्याची शिकार करण्यासाठी थेट कंपाऊंडमध्ये घुसला. काही क्षणातच चिमुकल्याने प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली. कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने बिबट्या घाबरून पळून गेला. बिबट्याच्या या थरारक हालचाली सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!