Today गुरूवार, 5th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

प्रफुल्ल शिवले यांच्या बैलगाडा शर्यतींमध्ये 537 बैलगाड्यांचा सहभाग; विक्रमी स्पर्धकांच्या सहभागाने करंदीतील शर्यती गाजल्या

प्रफुल्ल शिवले यांच्या बैलगाडा शर्यतींमध्ये 537 बैलगाड्यांचा सहभाग; विक्रमी स्पर्धकांच्या सहभागाने करंदीतील शर्यती गाजल्या

पाबळ: करंदी शिवजयंती उत्सव समिती, करंदी बैलगाडा संघटना आणि प्रफुल्ल काळुराम शिवले युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गट भव्य बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्पयात आली होती. त्याचा पहिला दिवस वेदश्री गणेश सुक्रे व प्रफुल्ल काळुराम शिवले यांच्या गाड्याच्या (10.93 मिली सेकंद ) जुगलबंदीने गाजवला. तर, दूस-या दिवशी ओमकार संतोष मांजरे व गणेश महाराज ताठे (11.39 मिली सेकंद) यांच्यात जुगलबंदी झाली. तिस-या व शेवटच्या दिवशी मात्र या स्पर्धेत चांगलीच रंगत भरली अन सागर नानासाहेब टाकळकर व वेदश्री गणेश सुक्रे यांच्यात 11.08 मिली सेकंदाची जुगलबंदीने संपूर्ण स्पर्धाची सांगता झाली.

सलग तीन दिवसांच्या या केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गट भव्य बैलगाडा स्पर्धेत दोन दिवस पावसाने व्यत्यय आणला. तरीही स्पर्धेतील उत्साह कमी झाला नाही. यात पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील सर्व 14 गावांतून तब्बल 537 टोकन घेवून तेवढ्याच संख्येने बैलगाडे सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेसाठी युवा नेते सागर टाकळकर, धनंजय नप्ते, नवनाथ नप्ते, प्रशांत ढोकले, नितीन शिवले, समीर शिवले, गणेश शिवले, संजय शिवले, पवन नप्ते, युवराज नप्ते, मंगेश साकोरे, राहुल नप्ते, गणेश टेमगिरे, शंकर टेमगिरे, बाबाजी कंद्रुप, मच्छिंद्र ढोकले, प्रवीण बगाटे, महेश झेंडे, महेंद्र झेंडे, बन्सी झेंडे, ज्ञानेश ढोकले, स्वप्निल ढोकले, अनिल कंद्रूप, नवनाथ कंद्रूप, बाबासाहेब झेंडे, शनि दरेकर, तुषार दरेकर, रामदास बोत्रे, नितीन दरेकर, दादा डफळ, सागर नप्ते, निलेश नप्ते, अक्षय नप्ते, गोविंद नप्ते, रमेश नप्ते. आकाश नप्ते, मयूर शेळके, शेखर नप्ते आदींसह पाबळ-केंदूरसह गटातील सर्व 14 गावातील युवा कार्यकर्ते, बैलगाडा मालक, शौकीन आणि क्रिडारसिकांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धा यशस्वी केली.

संपूर्ण स्पर्धेतील अंतीम दिवशीचे सर्व बक्षीसे वितरण वढु बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. जोरदार सनई चौघडे आणि भंडा-याच्या उधळीने बक्षीस वितरण संपन्न झाले.

बैलगाडा स्पर्धेतील विजेते 

पहिला दिवस..

फळीफोड – एकनाथ आप्पा मोरे आणि गणेश ताठे (जुगलबंदी)

दुसरा दिवस…

जुगलबंदी : भाऊसाहेब बळवंत झेंडे आणि गणेश महाराज ताठे

तिसरा दिवस…

जुगलबंदी : राहुलशेठ वसंत टाकळकर आणि तुकारामशेठ जाधव

तिनही दिवसांचे घाटाचा राजा विजेते 

पहिला दिवस : वेदश्री गणेश सुक्रे

दुसरा दिवस : स्वप्निल सुनील जाधव

तिसरा दिवस : प्रफुल्ल काळुराम शिवले आणि विराज वैभव प-हाड

फायनल फळीफोड विजेते 

दिवस पहिला..

वेदश्री गणेश सुक्रे आणि प्रफुल्ल काळुराम शिवले (जुगलबंदी : 10.93 मिली सेकंद)

दिवस दुसरा..

ओमकार शेठ संतोष मांजरे आणि गणेश महाराज ताठे (जुगलबंदी : 11.39 मिली सेकंद)

दिवस तिसरा..

सागरदादा नानासाहेब टाकळकर आणि वेदश्री गणेश सुक्रे जुगलबंदी (११.०८ मिली सेकंद)

घाटाचा महाराजा..

प्रफुल्ल काळुराम शिवले आणि विराज वैभव प-हाड (10.87 मिलीसेकंद)

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!