Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जमिन घोटाळा प्रकरणात सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘तो गरीब आहे, त्याला…’

जमिन घोटाळा प्रकरणात सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘तो गरीब आहे, त्याला…’

Supriya Sule On Land Scam: पुण्यातील तब्बल १८०० कोटी रुपयांच्या जमिनीचा फक्त ३०० कोटी रुपयांत व्यवहार झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर झाला असून, या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पार्थ पवार यांनी मात्र सर्व आरोप फेटाळत मी कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. तर अजित पवार यांनी यावर अद्याप मौनच पाळले आहे.

विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, ‘या प्रकरणात काहीतरी गोलमाल आहे. तहसीलदार आणि तलाठी यांना बिनबुडाचे निलंबन करण्यात आले. ते म्हणतात की आम्ही सहीच केली नाही, मग त्यांच्यावर कारवाई का झाली? तो गरीब अधिकारी आहे म्हणून त्याला कामावरून काढले, हा सरळ अन्याय आहे.’ त्यांनी सरकारकडे या दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्याची मागणी केली.

पत्रकारांनी विचारले, ‘तहसीलदारांचे निलंबन पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी झाले का?’ यावर सुळे म्हणाल्या, माझ्या माहितीनुसार पार्थ यांना काही प्रश्न विचारण्यात आले असून, त्यावर त्यांची कायदेशीर टीम उत्तर देईल. पण सरकार म्हणते व्यवहार होऊ शकत नाही, तर मग स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली? तहसीलदार म्हणतोय मी सही केली नाही, मग त्याला नोकरीवरून का काढले? हे स्पष्ट दाखवते की काहीतरी काळंबेरं आहे.

हेही वाचा – जमिनीचा घोटाळ्याच्या आरोपानंतर पार्थ पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले…,

सुप्रिया सुळे यांनी आणखी माहिती देताना सांगितले, ‘मी सकाळीच पार्थशी बोलले. त्याने स्पष्ट सांगितले की यात माझी काही चूक नाही आणि माझे वकिल लवकरच सर्व कागदपत्रांसह आपल्यासमोर येतील.’ दरम्यान, अजित पवार यांच्या मौनामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आले आहे. आता या कथित जमीन व्यवहारावर सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!