Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pimpri Chinchwad:‘मी इथला भाई, दोन हाफमर्डरच्या केस’,रिक्षाला कट मारल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने मारहाण

Pimpri Chinchwad:‘मी इथला भाई, दोन हाफमर्डरच्या केस’,रिक्षाला कट मारल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने मारहाण

पिंपरी: रिक्षाला धक्का मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात आणि हातावर कोयत्याने वार केल्याची घटना पिंपरीत घडली आहे. ‘मी येथील भाई आहे, माझ्यावर दोन हाफमर्डरच्या केस चालू आहेत’ असे बोलून दहशत निर्माण केली. ही घटना अजंठानगर, चिंचवड येथे घडली.

या प्रकरणी विशाल शिंदे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश विश्वंबर गायकवाड आणि दिगंबर विश्वंबर गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रस्त्यावर त्यांच्या मित्रासोबत गप्पा मारत असताना आरोपी आकाश याने रिक्षाने फिर्यादीला कट मारला. फिर्यादीने याचा जाब विचारला असता, त्याचा राग येऊन आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात व हातावर कोयत्याने वार केले.

दिगंबर याने हातातील कोयता हवेत फिरवून ‘मी इथला भाई आहे, माझ्यावर दोन हाफमर्डरच्या केस चालू आहेत. माझ्यामध्ये कोणीही आले तर मी त्यास सोडणार नाही’ असे बोलून परिसरात दहशत निर्माण केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!