Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Traffic : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

पुणे : पुणे शहरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग आज रात्री ११ वाजल्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हे काम १० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, या कालावधीत वाहतूक पूर्णतः ठप्प राहील.

भुयारी मार्गाच्या भिंतींमधून पाणी गळती होत असल्याने आत पाणी साचते, ज्यामुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे.

शंकरशेठ रस्त्यावरून येणाऱ्या वाहनचालकांनी भुयारी मार्ग टाळून डावीकडील रस्त्याने जेधे चौकात येऊन तेथून सारसबागेकडे वळावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे. पुणेकरांना वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!