Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Elon Musk Salary: बापरे!! एलोन मस्कला मिळालं 88,639,000,000,000 चं जगातील सर्वात मोठं पॅकेज

Elon Musk Salary: बापरे!! एलोन मस्कला मिळालं 88,639,000,000,000 चं जगातील सर्वात मोठं पॅकेज

Elon Musk Salary: जगातील सर्वात प्रसिद्ध अब्जाधीश एलोन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण आहे त्यांचा अविश्वसनीय पगार. टेस्लाच्या शेअरहोल्डर्सनी मस्कसाठी असे वेतन पॅकेज मंजूर केले आहे, ज्यामुळे ते इतिहासातील पहिले “ट्रिलियन डॉलर सीईओ” ठरू शकतात.

१ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे किती?
टेस्लाच्या नव्या भरपाई योजनेनुसार, एलोन मस्कला १ ट्रिलियन डॉलर्स, म्हणजेच अंदाजे ८८ लाख कोटी रुपये मिळू शकतात. ही रक्कम अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे. मात्र ही रक्कम रोख स्वरूपात नाही, तर मस्कला ४२ कोटी ३७ लाख नवीन शेअर्स कंपनीच्या कामगिरीनुसार मिळतील.

दरम्यान, एलोन मस्कला हे ट्रिलियन डॉलर्सचे पॅकेज तेव्हाच मिळेल जेव्हा तो टेस्लाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. हे करण्यासाठी, त्याला काही महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक उद्दिष्टे साध्य करावी लागतील. प्रथम, त्यांना टेस्लाचे बाजार मूल्य १.४ ट्रिलियन डॉलर वरून ८.५ ट्रिलियन डॉलर पर्यंत वाढवावे लागेल. त्यांना १ दशलक्ष सेल्फ-ड्रायव्हिंग रोबोटॅक्सी देखील लाँच करावे लागतील. शिवाय, २० दशलक्ष वाहनांची डिलिव्हरी पूर्ण करणे आणि बाजारात १ दशलक्ष ऑप्टिमस ह्युमनॉइड रोबोट आणणे हे देखील या उद्दिष्टाचा भाग आहेत. जर ही सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली तर एलोन मस्कचा हिस्सा १३ टक्के वरून २५ टक्के पर्यंत वाढेल आणि त्यानंतरच त्यांची कमाई १ ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त होईल.

एलोन मस्कला टेस्लाकडून निश्चित पगार मिळत नाही. त्याला मासिक किंवा वार्षिक वेतन नसते. त्याची कमाई पूर्णपणे शेअरच्या मूल्यानुसार ठरते. त्यामुळे कंपनीची प्रगती म्हणजे मस्कची संपत्ती. टेस्लाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष पुन्हा एकदा एलोन मस्ककडे लागले आहे. ते खरोखरच जगातील पहिले “ट्रिलियन डॉलर सीईओ” बनतील का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!