Today मंगळवार, 3rd नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

IND vs AUS 5th T20: गाबामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस, भारत-ऑस्ट्रेलिया सामना होणार की नाही? जाणून घ्या अपडेट्स

IND vs AUS 5th T20: गाबामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस, भारत-ऑस्ट्रेलिया सामना होणार की नाही? जाणून घ्या अपडेट्स

IND vs AUS 5th T20: भारत सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर, भारत पाच सामन्यांची मालिका जिंकेल. मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने तिसऱ्या आणि चौथ्या टी-20 सामन्यात प्रभावी विजय मिळवले.

ब्रिस्बेन हवामान स्थिती

हवामान वेबसाइट अ‍ॅक्यूवेदरनुसार, शनिवारी 8 नोव्हेंबर 2025 दिवसभर ब्रिस्बेन ढगाळ राहील. दिवसाचे तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, किमान तापमान 21 अंश असू शकते. दुपारी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे आणि संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5:45 ( भातानुसार 1 वाजून 45 मिनीट) वाजता टॉस होईल आणि सामना संध्याकाळी 6:15 वाजता सुरू होईल, परंतु या वेळी पावसाचा अंदाज चिंताजनक आहे.

हे पाहा पावसाचे वेळापत्रक

संध्याकाळी 5 वाजता: पावसाची शक्यता 47 टक्के

संध्याकाळी 6: ढगाळ वातावरण

संध्याकाळी 7-8: पावसाची 49टक्के शक्यता

रात्री 9-10: शक्यता 60 टक्क्यांपर्यंत वाढते.

रात्री 11: 49 टक्के पावसाची शक्यता

याचा अर्थ असा की संध्याकाळ होताच रिमझिम आणि मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. गाबा ची ड्रेनेज सिस्टीम बरीच चांगली आहे, परंतु सतत पाऊस पडत राहिल्यास सामना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर भारत 2-1 असा मालिका जिंकेल.

भारतासमोर मोठे आव्हान

भारतीय संघाला हा फायनल सामना पूर्ण करायचा असेल आणि मालिका विजयाने संपवायची असेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियालाही हा सामना टाय करायचा असेल कारण जर भारतनाते सामना जिकंला सीरीज भारताच्य नावावर होईल. टी 20 सामन्याचा महानिकाल आता आजच्या ब्रिस्बेनमधील हवामानावर अवलंबून असेल.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!