Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस; काय आहे नेमकं प्रकरण?

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस; काय आहे नेमकं प्रकरण?

Mumbai Police Notice to Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, मात्र यावेळी कारण थोडेसे वेगळे आहे. कारण, मनोज जरांगे यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मुंबईच्या आझाद नगर पोलिसांनी मनोज जरांगे पाटील आणि विरेंद्र पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मार्च महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जरांगे पाटलांना 10 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मार्च-एप्रिल महिन्यात जरांगे पाटील, विरेंद्र पवार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात चौकशी पुढे नेण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तपास यंत्रणेनुसार, या चौकशीत काही नवे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील वादही चांगलाच पेटलेला आहे. नुकतेच जरांगे यांनी धक्कादायक दावा करत सांगितले की, “मी नार्को टेस्टसाठी तयार आहे, पहिला अर्ज मीच देईन.” त्यांनी प्रत्यक्ष अर्ज लिहून आपल्या सहकाऱ्याद्वारे जालन्यातील पोलीस अधीक्षकांकडे सुपूर्द करण्याचे सांगितले आहे. या अर्जात त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच गृह व न्याय विभागांचा उल्लेख केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून, “जरांगे पाटील मराठा आणि ओबीसी समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे प्रत्युत्तर दिले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!