Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शरद पवारांनी काढला हुकमी एक्का; ‘या’ एकनिष्ठ नेत्याची सोलापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती

शरद पवारांनी काढला हुकमी एक्का; ‘या’ एकनिष्ठ नेत्याची सोलापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती

सोलापूर: एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सोलापूरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी तडकाफडकी राजीनामा देत अजित पवार गटात प्रवेश केला. तो शरद पवारांसाठी धक्का असल्याचं मानलं जात असताना पवारांनी त्यांचा विश्वासू मोहरा समोर आणला आहे. सोलापूर शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महेश गादेकर हे 1992 पासून शरद पवारांसोबत काम करतात. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि पवारांसोबत गेले. तेव्हापासून आतापर्यंत ते पवारांशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे आता शरद पवारांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा विश्वासू नेत्याकडे सोपवल्याची चर्चा आहे.

कोण आहेत महेश चंद्रकांत गादेकर?

महाविद्यालयीन जीवनापासून महेश गादेकर यांनी समाजकारण आणि राजकारणास सुरुवात केली. 1992 झाली त्यांच्या पक्षीय राजकारणास सुरुवात झाली. सोलापूर शहर युवक काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या कामाच्या जोरावर 1996 साली ते सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1997 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी सर्वात जास्त तरुण कार्यकर्त्यांना तिकिटे देऊन निवडून आणले. 1999 साली राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

सन 2010 साली त्यांच्यावर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पक्षाने दिली. 2012 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात जास्त 17 नगरसेवक निवडून आणले. 2014 मध्ये त्यांनी सोलापूर शहर उत्तर मतदार संघात विधानसभेची निवडणूक लढवली. आता त्यांच्यावर पुन्हा एकदा सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

खासदार शरद पवार साहेब यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी सोलापुरात पहिला भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमास राज्यातील आणि देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सोलापूर शहराध्यक्ष असताना त्यांनी फिरता दवाखाना ही संकल्पना सलग पाच वर्षे राबवत पाच लाख लोकांवर मोफत उपचार केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!