मुंबई : ‘बिग बॉस’ हा शो प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. या शोमध्ये दिवसेंदिवस अनेक घडामोडी घडत आहेत. असे असताना ‘बिग बॉस १९’चा हा ‘वीकेंड का वार’ एपिसोड खूपच स्फोटक झाला. सलमान खान पूर्ण फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. त्याने फरहाना भट्ट, तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांना शोमध्ये चांगलेच फटकारले.
‘बिग बॉस’च्या रविवारच्या एपिसोडमध्ये मोठं नाट्य पाहायला मिळाले. गौरव खन्नाने फरहाना आणि तान्याच्या मैत्रीवर निशाणा साधला आणि त्यांना फटकारले. रविवारच्या एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला होता. सलमान खानने घरातील सदस्यांना एक टास्क दिला. ज्या घरातील सदस्यांना एकमेकांचे नाते आवडत नाही, त्यांनी त्यांना त्यांच्या जागी बसवावे. या टास्कमध्ये गौरव खन्नाने घरातील दोन सर्वात लोकप्रिय महिला, फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल यांचे नाव घेतले.
गौरव खन्नाने त्यांना त्यांची मैत्री आवडत नाही. कारण स्पष्ट करताना गौरव खन्ना म्हणाला, या दोघांच्या एकत्र येण्याने घरात भांडणं दहापट वाढली आहेत. अमाल मलिक याने तान्या आणि फरहानाची मैत्री खरी नसल्याचे म्हटले. त्यांची मैत्री घरात फक्त नाटकं निर्माण करण्यासाठी आहे. शनिवारच्या भागात सलमान खानचा फरहाना भट्टवर राग आल्याचे दिसून आले. सलमान खानने टीव्ही इंडस्ट्री आणि गौरव खन्ना यांचा अपमान केल्याबद्दल तिला फटकारले. सलमानच्या फटकारानंतर फरहाना भावूक झाली. तेव्हा ती खूप रडल्याचे दिसून आले.


