Today शुक्रवार, 6th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दिल्ली लाल किल्ला नाही तर आयोध्येतील राम मंदिर खरं टार्गेट; तपासात धक्कादायक माहिती

दिल्ली लाल किल्ला नाही तर आयोध्येतील राम मंदिर खरं टार्गेट; तपासात धक्कादायक माहिती

नवी दिल्ली: दिल्ली लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर पूर्ण देश हादरला आहे. अनेक महत्वाच्या शहरांत अलर्ट जारी करण्यात आला. हे सगळं सुरू असताना या घटनेत आता नवनवे आणि धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तपासात समोर आलं की, काही दिवसांपासून या स्फोटाची योजना आखली जात होती. त्याचबरोबर दिल्लीतील लाल किल्ला हे त्यांचं टार्गेट नसून त्यांचं टार्गेट अयोध्या आणि वाराणसी होतं

विविध ठिकाणांहून अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. दहशतवाद्यांनी अयोध्या आणि वाराणसीतील राम मंदिराला टार्गेट केले होते. ज्याचे एक मॉड्यूल तयार केले होते. तपासात हे स्पष्ट झाले की, या दहशतवाद्यांना दिल्ली नव्हे तर अयोध्येत स्फोट घडवायचा होता. अटक करण्यात आलेली शाहीन हिने अयोध्येत स्लीपर मॉड्यूल सक्रिय केले होते.

आतापर्यंतच्या तपासातून असे दिसून येते की, स्फोटकांमध्ये कोणताही टायमर नव्हता. हा स्फोट घाईघाईत झाला. दहशतवाद्यांनी चाैकशीत सांगितले की, त्यांना स्फोट जास्तीत जास्त लोक असलेल्या ठिकाणी उडवायचा होता. सुरक्षा एजन्सींसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे की, उर्वरित 300 किलो अमोनियम नायट्रेट त्यांना जप्त करायचा आहे. याकरिता दहशतवाद्यांकडून कसून चौकशी केली जात आहे. दहशतवाद्यांनी हे लपून ठेवले आहे.

माहितीनुसार, एजन्सीने आतापर्यंत 2,900 किलो स्फोटके जप्त केली आहेत. हे स्फोटके जप्त करण्यासाठी सतत छापेमारी केली जात आहे. दिल्लीत स्फोट करण्यात आलेल्या i-20 कार दिल्लीत कुठे कुठे गेली होती, याचा शोध घेतला जात आहे. गाडीत स्फोटके नेमकी कुठे भरण्यात आली, याचा शोध सुरू आहे. तीन तास जवळपास लाल किल्ल्याजवळीला पार्किंगमध्ये ही गाडी उभी होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!