Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Viman Nagar Tragedy: डंपरच्या हॉर्नमुळे 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू! नेमकं काय घडलं?

Viman Nagar Tragedy: डंपरच्या हॉर्नमुळे 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू! नेमकं काय घडलं?

पुणे: विमाननगर परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डंपरच्या मोठ्या हॉर्नमुळे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मृत तरुणाचं नाव सचिन वसंत धुमाळ (वय 28, रा. मल्हारनगर, वडगावशेरी) असं असून, त्याचा मित्र स्वप्नील भानुदास माने (वय 25) हा जखमी झाला आहे.

दोघेही एका फायनान्स कंपनीत सेल्स ऑफिसर म्हणून काम करत होते. शनिवारी रात्री ते दोघे मोटारसायकलवरून खराडी बायपासकडे जात असताना, टाटा गार्डन चौकाजवळ त्यांच्या मागून येणाऱ्या डंपरने जोरात हॉर्न वाजवला. अचानक आलेल्या मोठ्या आवाजामुळे सचिनचा तोल गेला आणि मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. दोघे रस्त्यावर पडले आणि त्याच क्षणी वेगाने येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली सचिन सापडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – नंदुरबारमध्ये भीषण अपघात! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस 150 फूट खोल दरीत कोसळली; 20 ते 30 विद्यार्थी होते बसमध्ये

स्वप्निल जखमी अवस्थेत असूनही त्याने मित्राला उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र सचिनला जागेवरच मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी सचिनला ससून रुग्णालयात हलवले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. अपघातानंतर डंपर चालकाने वाहनासह पलायन केले. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत दाखल केला आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे डंपर आणि चालकाचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!