Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Samsung चा 59999 रुपयांचा फोन मिळतोय 28000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत; फीचर्सही जबरदस्त…

Samsung चा 59999 रुपयांचा फोन मिळतोय 28000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत; फीचर्सही जबरदस्त…

नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही एक चांगली संधी आहे. फ्लॅश मेमरीच्या कमतरतेमुळे या फोनच्या किंमत वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीच्या किमती आणखीन वाढू शकतात, असा अंदाज आहे. आता तुम्ही निम्म्यापेक्षा कमी किमतीत शक्तिशाली सॅमसंग फोन खरेदी करू शकता.

Samsung Galaxy S24 FE असे या फोनचे नाव आहे. गेल्या वर्षी ५९९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेला हा स्मार्टफोन आता २८००० रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटवर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ३१९९९ रुपयांना लिस्टेड झाला आहे. या फोनच्या खरेदीवर तुम्हाला बँक ऑफर देखील मिळत आहे. बँक ऑफरचा एक भाग म्हणून स्मार्टफोनवर ४००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ज्यामुळे तुम्ही हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करू शकणार आहात. बँक डिस्काउंटनंतर या फोनची किंमत २७९९९ रुपयांपर्यंत घसरू शकते.

फोन खरेदीची ही ऑफर फ्लिपकार्ट एसबीआय आणि फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस क्रेडिट कार्डवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला कमी किमतीत फ्लॅगशिप फोन हवा असेल तर तुम्ही हा फोन निवडू शकता. हा फोन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट ३१९९९ मध्ये लिस्टेड झाला आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३५९९९ आहे. यावर तुम्हाला बँक ऑफर देखील मिळेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!