Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे मिळू शकते नोकरी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

Job Alert ! मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे मिळू शकते नोकरी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई येथे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजर (सीएसआर मॅनेजर) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.

यामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://sgnp.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजर (सीएसआर मॅनेजर)
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.

– नोकरीचे ठिकाण : बोरिवली, मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल) / ऑफलाईन.

– अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपसंचालक (दक्षिण) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (एसजीएनपी) यांचे कार्यालय, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०००६६.

– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : ddssgnp@gmail.com

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!