Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ठाकरे गटाला मोठा धक्का! नाशिकमधील ‘हा’ बडा नेता सोडणार उद्धव ठाकरेंची साथ

ठाकरे गटाला मोठा धक्का! नाशिकमधील ‘हा’ बडा नेता सोडणार उद्धव ठाकरेंची साथ

नाशिक: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात २ डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर निकाल ३ डिसेंबरला घोषित केले जातील. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून नेते-कार्यकर्त्यांच्या पक्षांतरालाही जोर आला आहे.

याच घडामोडीत शिवसेना (ठाकरे गट) ला नाशिकमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. सिन्नर नगरपरिषद निवडणुकीत अनपेक्षित कलाटणी मिळाली असून ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. हेमंत वाजे हे सिन्नर नगराध्यक्षपदासाठी ठाकरे गटाकडून संभाव्य उमेदवार मानले जात होते. त्यामुळे ठाकरे गटाचा मुख्य चेहराच भाजपकडे वळल्यानं उद्धव ठाकरे यांना निवडणुकीच्या उंबरठ्यावर मोठा फटका बसल्याचं चित्र दिसत आहे.

हेही वाचा – इंदापूरमधील राजकारण तापलं! उमेदवार निवडीवरून अजित पवारांच्या पक्षात बंडाचा झेंडा

हेमंत वाजे यांचे स्थानिक राजकारणात मोठे योगदान आहे. ते पूर्वी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच गटनेते म्हणून काम पाहिलं असून त्यांचा मजबूत कार्यकर्ता आधार कायम आहे. त्यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा देखील भक्कम असून त्यांच्या आई रुक्मिणी वाजे आमदार राहिल्या आहेत, तर वडील नगराध्यक्ष पदावर होते.

या पार्श्वभूमीवर भाजपने वाजे यांना आपल्या गोटात खेचत महत्त्वाची चाल खेळली आहे. ही खेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने राबवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपच्या या पावलामुळे केवळ ठाकरे गटाचाच नव्हे तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) चा देखील समीकरणांमध्ये गोंधळ वाढला आहे. कारण राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष पदासाठी हेमंत वाजे यांच्याइतका समर्थ आणि लोकप्रिय पर्याय नसल्याचे मानले जाते. आता भाजपकडून हेमंत वाजेंनाच नगराध्यक्षपदाचे तिकीट देण्याची शक्यता अधिक मानली जात असून सिन्नरमधील राजकीय वातावरण तापले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!