मराठी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले जवळपास 20 वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. टीव्हीमधून सुरू केलेल्या तिच्या प्रवासात ती आता चित्रपटांमध्ये पोहोचली. आता तिने थेट रश्मिका मंदानाला टक्कर दिली आहे. गिरिजाचे काही फोटो व्हायरल झाले. त्यानंतर रातोरात गिरिजा सध्याच्या घडीची नॅशनल क्रश बनली आहे. पण आता, हीच लोकप्रियता तिच्यासाठी अडचणीची ठरली आहे. यामागील कारण म्हणजे एआय फोटो, जे गिरिजाने या फोटोंबद्दल एक व्हिडिओ बनवला ज्यात तिने चिंता व्यक्त केली आहे.
गिरिजा ओकने शेअर केला व्हिडिओ
गिरिजा ओकने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती चाहत्यांचे आभार मानताना दिसत आहे. परंतु या व्हायरल ट्रेंडमध्ये तिला एक गोष्ट खटकल्याचेही तिने सांगितले आहे. गिरिजाने सांगितले की, अचानक एवढं प्रेम मिळतंय, अनेकांचे फोन मेसेज येतायत. अनेकजण माझे मीम्सदेखील पाठवतायत. हे सर्व खूप जास्त क्रिएटिव्ह आहे. त्यामुळे खूप भारी वाटतंय.
गिरिजाला खटकली ही गोष्ट
गिरिजाला जरी सोशल मिडियावर खूप प्रेम मिळत असले तरी तिला एक गोष्ट खटकली आहे. गिरिजाने सांगितले की, या व्हायरल फोटोंमध्ये काही फोटो एडिट केलेले आहेत. हे असं होणारच हे मला माहित आहे. काही फोटो एआयच्या माध्यमातून अश्लील बनवले गेले आहेत. अनेकांचे असे अश्लील फोटो व्हायरल होत असतात. मात्र, तुमच्या पोस्टवर क्लिक करावं म्हणून हे केलं जातंय का, याला काही नियम नाहीयेत. परंतु मला एका गोष्टीची भीती वाटतेय की, माझा मुलगा सध्या १३ वर्षांचा आहे. त्याने पुढे भविष्यात हे फोटो पाहिले तर, त्याला माहित असणारे हे खरं नाहीये. हा फोटो एडीट केलाय. मात्र, तरीही हा फोटो व्हायरल होऊ नये असं मला वाटतंय. हे फोटो एडीट करणारे किंवा अपलोड करणारे जरी तुम्ही नसाल तर लाइक्स आणि शेअरच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहचवत असाल तर एकदा विचार करा, असं गिरिजाने म्हटलंय.
आमिर खानच्या चित्रपटात काम
मराठी अभिनेता गिरीश ओक यांची मुलगी गिरीजा ओक गोडबोले हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटांमध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाते. २००७ मध्ये आमिर खान आणि दर्शील सफारी अभिनीत “तारे जमीन पर” चित्रपटात ती दिसली होती. तिने “शोर इन द सिटी”, नेटफ्लिक्स चित्रपट “काला”, “द व्हॅक्सिन वॉर” आणि शाहरुख खानचा आगामी २०२३ मध्ये येणारा “जवान” चित्रपट यासारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.


