बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने विजय नावावक केला आहे. 172 जागांवर एनडीएने विजय मिळवला आहे. यामुळं भाजप आणि जेडीयू दोन्ही गटांमध्ये आनंदाची लाट आहे. एनडीएमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमाकंकावर नितीश कुमार यांचा जेडीयू आहे. पण सर्वात मोठा प्रश्न कायम आहे की, बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, यासंदर्भात भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळं पुढील मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार होणारी की नाही यावरुन सस्पेंस वाढला आहे.
नेमकं काय म्हणाले विनोद तावडे?
विनोद तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार निवडणूक लढवली आहे. मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पाचही पक्ष एकत्रितपणे घेतील असं वक्तव्य विनोद ताडवे यांनी केलं आहे. भाजप आणि जेडीयू व्यतिरिक्त, एनडीएमध्ये जीतन राम मांझी यांचा पक्ष एचएएम, उपेंद्र कुशवाहांचा पक्ष आरएमएल आणि चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपीआर यांचा समावेश आहे. त्यामुळं हे सर्व पक्ष मिळून मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली आहे. त्यामुळं नितीश कुमारांबाबत सस्पेंन्स कायम आहे.
भाजप सर्वात मोठा पक्ष
भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलायचे झाले तर, महाआघाडीप्रमाणे एनडीएने निवडणुकीपूर्वी कोणतीही औपचारिक घोषणा केली नव्हती. चिराग पासवान आणि जीतन राम मांझी यांनी नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असे सांगितले होते. नितीश कुमार यांनी आतापर्यंत नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते 10 व्यांदा शपथ घेणार की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईल.


