Today सोमवार, 3rd ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime Branch : पुणे गुन्हे शाखेतील ४ पोलिस शिपायांचे निलंबन, व्यावसायिकांना धमक्या देत पैसे उकळले

Pune Crime Branch : पुणे गुन्हे शाखेतील ४ पोलिस शिपायांचे निलंबन, व्यावसायिकांना धमक्या देत पैसे उकळले

Pune Crime Branch : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कॉप्स २४ शाखेतील चार पोलिस शिपायांवर वसुलीचा गंभीर आरोप ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी आळंदी रोड पोलीस चौकीच्या हद्दीतील व्यावसायिकांना “पैसे दिले नाहीत तर धंदा बंद” अशा धमक्या देत शिवीगाळ केली होती.

स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली असून, यापूर्वीही या कर्मचाऱ्यांविरुद्ध वसुलीच्या तक्रारी नोंदवल्या होत्या. या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला असून, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी तात्काळ निलंबनाचा आदेश दिला आहे.

पोलीस शिपाई योगेश सुरेश माळी, पोलीस शिपाई मुकेश श्रीधर बाळले, पोलिस शिपाई शंकर दत्ता धोत्रे, पोलीस शिपाई कैलास शेषराव फुपाटे असे कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व चार जण गुन्हे शाखेतील कॉप्स २४ शाखेत कार्यरत होते. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी आळंदी रोड परिसरातील व्यावसायिकांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तक्रारीत सांगितले की, हे पोलिस कर्मचारी कर्तव्यावर असताना व्यावसायिकांना भेटून, “आम्ही पोलिस आहोत, आमच्याकडे पैसे मागितले तर तुम्हाला हद्दीत धंदा करू देणार नाही. आमचे कोणी काही करू शकत नाही” असे म्हणत धमकावले आणि शिवीगाळ केली. यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याने या चार जणांविरुद्ध कसुरी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. विशेष बाब म्हणजे, याआधीही या कर्मचाऱ्यांविरुद्ध वसुलीच्या तक्रारी पोलिस आयुक्तालयात दाखल झाल्या होत्या. यामुळे त्यांचा बेजबाबदार वर्तनाचा इतिहास उघड झाला.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या कर्मचाऱ्यांवर “कर्तव्यावर असताना बेफिकीरपणा, बेजबाबदारी आणि जनमानसात पोलिसांच्या प्रतिमेला कलंक लावणे” असा ठपका ठेवत निलंबनाचा आदेश दिला. ही कारवाई तक्रारी मिळाल्यानंतर तात्काळ करण्यात आली असून, आता आंतरिक चौकशी सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!