Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kalyan Crime News : शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह 7 जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Kalyan Crime News : शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह 7 जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

कल्याण : कल्याणमधील वडवली परिसरात बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याच्या आरोपावरून शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना उपशहर प्रमुख वैभव पाटील याच्यासह सात जणांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बांधकाम व्यावसायिक मंगेश दशरथ गायकर यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे ‘मंगेश स्टार’, ‘मंगेश हेवन’ आणि ‘मंगेश जेमिनी’ हे प्रकल्प वडवलीत सुरू आहेत. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३३ वाजता वैभव दुर्योधन पाटील, सुनिल राजाराम पाटील, पंकज पाटील, उद्धव पाटील, तेजस पाटील, ध्रुव पाटील आणि करण पाटील असे सात आरोपी साइटवर आले.

त्यांनी कामगार, कंत्राटदार आणि स्टाफला शिवीगाळ करून काम बंद पाडले. ‘हा भाग आमचा आहे, माल आमच्याकडून घ्या किंवा प्रत्येक गाडीमागे ३,००० रुपये द्या’ अशी खंडणी मागितली. तसेच, ‘आमची परवानगी नाही तोपर्यंत साइट सुरू करू नका, अन्यथा जीवे मारू’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

गायकर यांनी सांगितले की, याआधीही दोनदा अशा धमक्या मिळाल्या होत्या. वारंवार त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. ते म्हणाले, “कामासाठी तांत्रिक कौशल्य असलेले कामगार लागतात, सर्व स्थानिकांना रोजगार देणे शक्य नाही.” त्यांनी आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी केली आहे.

दरम्यान, वैभव पाटील यांनी सर्व आरोप नाकारले. ते म्हणाले, “मी कोणतीही खंडणी मागितलेली नाही. पुरावे असतील तर दाखवा. मी फक्त स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा म्हणून व्यावसायिकांशी दोन बैठका घेतल्या होत्या.” गुन्हा २० दिवसांनंतर दाखल झाल्याबाबत शंका व्यक्त करत ते पुढे म्हणाले, “महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी व्यावसायिकाला हाताशी धरून हा खोटा डाव रचला आहे.” पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, परिसरातील राजकीय वातावरण तंग झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!