Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात अजित पवार गटाला मोठा धक्का; स्थानिक नेतृत्वाला कंटाळून बड्या नेत्याचा राजीनामा

पुण्यात अजित पवार गटाला मोठा धक्का; स्थानिक नेतृत्वाला कंटाळून बड्या नेत्याचा राजीनामा

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे ढळत आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका तोंडावर येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला पुणे ग्रामीणमधून मोठा धक्का बसला आहे.

पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली असून, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र पॅनल उभे करणार आहेत. हे पाऊल शरद पवार गटासोबत आघाडी करण्याच्या दिशेने असल्याचे संकेत देत असून, अजित पवार यांच्या गटाच्या स्थानिक पकडीला प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

इंदापूर नगराध्यक्षपदावरून धुसफूस

इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत (अजित गट) वाद पेटला होता. गारटकर यांनी पक्षाकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली होती, परंतु पक्षाने माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना प्राधान्य दिले. याला गारटकर यांनी ठाम विरोध दर्शवला आणि “पक्षाने आम्हाला टाळले तर आम्हीही पक्षाला कोलमडवू” असा थेट इशारा अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला होता.

गेल्या काही दिवसांपासून निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप करत स्थानिक नेतृत्वाच्या राजकारणाला कंटाळल्याचे सांगून त्यांनी हा निर्णय घेतला. १७ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजीनामा देऊन स्वतंत्र पॅनलच्या प्रचारात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदीप गारटकर हे अजित पवार यांच्या गृह जिल्ह्यातील (पुणे ग्रामीण) प्रमुख चेहरे मानले जातात. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत ते संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे इंदापूरसह पुणे ग्रामीणमधील पक्षाची पकड कमकुवत होण्याची शक्यता आहे.

गारटकर यांच्याशी बोलणी सुरू असलेल्या स्थानिक नेत्यांसोबत आघाडी करून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जेजुरीसारख्या ठिकाणी शरद पवार गटाकडून झालेल्या उमेदवारी वाटपानंतर आता इंदापूरमध्येही समान रणनीती दिसून येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!