Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राजगडवर माकडांचा कहर! दगड कोसळल्याने मुंबईतील महिला ट्रेकर गंभीर जखमी

राजगडवर माकडांचा कहर! दगड कोसळल्याने मुंबईतील महिला ट्रेकर गंभीर जखमी

पुणे : प्रसिद्ध राजगड किल्ल्यावर रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. बालेकिल्ला परिसरात माकडांच्या हालचालीदरम्यान एक दगड खाली कोसळला आणि तो थेट मुंबईतील ट्रेकरच्या डोक्यावर आदळला. या अपघातात महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. जखमी ट्रेकरची ओळख वर्षा हुंडारी (३८) अशी झाली आहे. त्या मुंबईहून तब्बल २० महिलांच्या ट्रेकिंग ग्रुपसोबत राजगड मोहिमेसाठी आल्या होत्या. किल्ल्यावरून खाली उतरत असताना अचानक वरून दगड घसरून आला आणि त्यांच्या डोक्यावर आदळला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेकिल्ला परिसरात अनेक माकडे उड्या मारत होती. त्यापैकी एका माकडाने चुकून दगड ढकलला आणि तो थेट खाली येऊन महिलेवर आदळला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांच्या गटाने तातडीने बचाव कार्याचे समन्वयक ओंकार ओक यांना माहिती दिली. किल्ल्याचे रक्षक विशाल पिलावरे, बापू साबळे, दादू वेगरे यांच्या मदतीने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने त्वरित बचावकार्य राबवण्यात आले.

हेही वाचा – Pune-Daund DEMU : पुणे-दौंड डेमूच्या धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू, हडपसर परिसरातील घटना

सुमारे अर्ध्या तासात बचाव पथकाने हुंडारी यांना स्ट्रेचरच्या साहाय्याने खाली आणले. जखमी महिलेची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!