Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

“सध्या अर्थ खातं माझ्याकडेच…” फडणवीसांच्या विधानाने महायुतीत खळबळ; अर्थ खात्यावरून नवा तणाव?

“सध्या अर्थ खातं माझ्याकडेच…” फडणवीसांच्या विधानाने महायुतीत खळबळ; अर्थ खात्यावरून नवा तणाव?

Maharashtra politics : महायुती सरकारमधील महत्त्वाच्या अर्थ खात्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. “सध्या तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे,” असे त्यांनी म्हटल्याने हे खाते भविष्यात कोणाकडे जाणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अर्थ खातं हे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेलं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात महत्त्वाचं मानलं जाणारं खातं आहे. मात्र सध्याच्या सरकारमध्ये गृह, अर्थ आणि नगरविकास ही तीन प्रमुख खाती घटक पक्षांमध्ये वाटप झालेली असली तरी अर्थ खात्याच्या नियंत्रणावरून पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून यापूर्वीच अर्थ खात्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही हा मुद्दा पक्षाच्या अजेंड्यावर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अर्थ खात्यावर पुन्हा दावा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या ताज्या विधानामुळे या चर्चेला वेगळे वळण मिळाले असून अर्थ खात्यावरील अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट नसल्याचेच राजकीय संकेत मिळत आहेत. यामुळे महायुतीतील अंतर्गत समतोल आणि खातेवाटपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!