Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धाराशिवमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची ऐतिहासिक हातमिळवणी, तर गुहागरमध्ये बाप-बेटा एकमेकांविरुद्ध

धाराशिवमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची ऐतिहासिक हातमिळवणी, तर गुहागरमध्ये बाप-बेटा एकमेकांविरुद्ध

Maharashtra Politics : शरद पवारांच्या सूचनेनंतर धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (अजित पवार आणि शरद पवार) एकत्र आले आहेत. जागावाटपाचा ५०-५० फॉर्म्युला ठरला असून घड्याळ चिन्हावर अध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणात उतरला आहे. येथे भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुती आणि दुसरीकडे शिवसेना (उबाठा)-काँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे.

महाडमध्ये मुस्लिम मतदारांचा मोठा धक्का

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये भाजपला जागा देण्याच्या निर्णयाचा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. साईल नगर येथील प्रभावशाली नेते स्नेहल जगताप यांचे समर्थक असलेले अनेक मुस्लिम मतदार तडकाफडकी शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. माजी सरपंच मन्सूर ताज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेशप्रसंगी मंत्री भरत गोगावले आणि विकास गोगावले यांच्या कार्याची स्तुत्य केली गेली. या घटनेमुळे महाडमध्ये राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

बाप-बेट्याची थेट लढत

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर नगरपंचायतीत एक अनोखे चित्र निर्माण झाले आहे. वॉर्ड क्रमांक १३ मधून वडील राजेंद्र अर्जुन भागडे (शिंदे गट शिवसेना) तर त्यांचाच मुलगा सौरभ राजेंद्र भागडे (अजित पवार गट राष्ट्रवादी) यांच्यात थेट सामना रंगणार आहे. बाप-बेट्याची ही राजकीय लढत आता गुहागरकरांच्या चर्चेचा विषय बनली आहे. स्थानिक निवडणुकांआधीच महाराष्ट्रात पक्षांतर, युती-आघाड्या आणि कौटुंबिक भांडणे यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!