Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नोटीस घरी स्वीकारणार नाही…; अमित ठाकरेंच्या भूमिकेमुळे शिवतीर्थाबाहेर ताटकळलेले पोलीस माघारी परतले

नोटीस घरी स्वीकारणार नाही…; अमित ठाकरेंच्या भूमिकेमुळे शिवतीर्थाबाहेर ताटकळलेले पोलीस माघारी परतले

Amit Thackeray: नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केल्यामुळे अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस अमित ठाकरेंनी नोटीस देण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचले होते. नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केल्यामुळे आणि जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नोटीस देण्यासाठी आज पोलीस शिवतीर्थावर आले आहेत, मात्र अमित ठाकरेंनी घरी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे.

अमित ठाकरेंचा घरी नोटीस स्वीकारण्यास नकार

नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी आज पोलीस अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचले होते. मात्र अमित ठाकरे यांनी मी नेरूळ पोलीस स्टेशनला आलो असतो नोटीस घरी स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे नेरूळ पोलीस शिवतीर्थाबाहेर नोटीस देण्यासाठी वेटिंगवर होतेअसे पहायला मिळाले.

महाराजांसाठी पहिली केस झाली…

अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. ‘महाराजांसाठी पहिली केस झाली असेल तर चांगलं आहे. मला बरं वाटतंय. काल दिघा आणि कोपर खैराणे ला गेलेलो. गजानन काळे सोबत होते. त्यांनी सांगीतलं की महाराजांचा पुतळा आहे पण चार महिने अनेक आंदोलने करून देखील खुला केला नाही. काल त्या ठिकाणी मी गेलो आणि उद्घाटन केले’ असं अमित ठाकरे म्हणाले होते.

नेत्यांना पुतळ्याच्या उद्घाटनाला वेळ नाही अमित ठाकरे

पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले होते की, ‘महाराजांसाठी मराठी माणूस पेटून उठतो. गेल्या चार महिन्यात ते एअरपोर्टला गेले दहीहंडीला गेले पण त्यांना उदघाटन करायला वेळ नाही मिळाला. त्यांनी पुन्हा कपडा बांधला तर आम्ही पुन्हा ओपन करू. पुतळा लोकांना दर्शनासाठी खुला केला आहे. पोलिसांचे काम आहे, त्यांना मी काही बोलणार नाही कारण पोलिसांवर वरून प्रेशर असतो.’

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!