Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMPML Bus Accidents: धक्कादायक! पुण्यात पीएमपीएमएल बस अपघातांमध्ये वाढ; 19 महिन्यांत 44 जणांचा मृत्यू

PMPML Bus Accidents: धक्कादायक! पुण्यात पीएमपीएमएल बस अपघातांमध्ये वाढ; 19 महिन्यांत 44 जणांचा मृत्यू

PMPML Bus Accidents: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुरक्षितता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पीएमपीएमएल बस अपघातांची संख्या गेल्या वर्ष-दीड वर्षात लक्षणीयरीत्या वाढली असून, आकडेवारी पाहता परिस्थिती किती धोकादायक बनली आहे हे स्पष्ट होते. मागील १९ महिन्यांत तब्बल ४४ जणांनी जीव गमावला आहे तर ५५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. यामुळे बस चालकांचे प्रशिक्षण, देखरेख आणि प्रशासनाच्या सुरक्षाविषयक पद्धतींवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पीएमपीएमएलच्या बसेस २२ गंभीर अपघातांत सामील झाल्या. यात १५ जणांचा मृत्यू झाला तर ११ जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटना मागील वर्षांच्या तुलनेत अधिक आहेत. २०२४ मध्ये एकूण ५३ अपघातांची नोंद झाली होती. त्यातील १२ अपघात चालकांच्या चुकीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र चालू आर्थिक वर्षात ही संख्या दुप्पट झाली असून २८ दुर्घटनांना थेट चालकांची चूक कारणीभूत ठरली आहे.

हेही वाचा – Pune: पुणेकरांनो लक्ष द्या! उघड्यावर शेकोटी पेटवल्यास बसणार दंड, थंडीच्या दिवसात महापालिकेचा अजब निर्णय

अनेक प्रवाशांनी चालकांच्या बेफिकीर वागणुकीबाबत गंभीर तक्रारी केल्या आहेत. कात्रज येथील महिला प्रवासी म्हणाल्या, चालकांनी रस्त्यावर अचानक वेग वाढवणे किंवा झटका देऊन ब्रेक लावणे हे जणू नेहमीचे झाले आहे. कितीदा सांगितलं, तक्रारी केल्या… पण काहीच बदल होत नाही. तथापी, आणखी एका प्रवाशाने सांगितले की, या महिन्यात दोनदा आमची बस एका दुचाकीला धडकणारच होती. चालकांना वेगाची अजिबात पर्वा नसल्याचे दिसते. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!