Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: लग्नाचा व्हिडिओ ‘व्हायरल’ झालेल्या जोडप्याच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट; भररस्त्यात पतीने कापले पत्नीचे ओठ

Pune Crime: लग्नाचा व्हिडिओ ‘व्हायरल’ झालेल्या जोडप्याच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट; भररस्त्यात पतीने कापले पत्नीचे ओठ

Pune Crime: सोशल मीडियाच्या झगमगाटात ज्यांच्या लग्नाची चर्चा झाली, त्याच नात्याचा अंत आता रक्ताच्या थारोळ्यात होताना दिसत आहे. पुण्यातील खडकी परिसरात एका पतीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घटस्फोटाच्या वादातून ही खळबळजनक घटना घडली असून, पोलिसांनी पती राहुल महादेव कांबळे (३०) याला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?
आरोपी राहुल कांबळे आणि जखमी सायली भिसे (२२) यांचा विवाह काही महिन्यांपूर्वी आळंदी येथे थाटामाटात पार पडला होता. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. मात्र, संसाराची ही गाडी फार काळ टिकली नाही. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. सध्या शिवाजीनगर न्यायालयात त्यांचा कायदेशीर लढा सुरू आहे.

हल्ल्याचा थरार:
१४ एप्रिलच्या रात्री सायली आपल्या मैत्रिणीसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह पाहून घरी परतत होती. याच संधीचा फायदा घेत राहुलने तिला औंध रोड परिसरात गाठले. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करण्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. रागाच्या भरात राहुलने सायलीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याने तिच्या कपाळावर, गालावर, खांद्यावर आणि ओठांवर गंभीर वार केले.

पीडितेचा पोलिसांच्या भूमिकेवर संताप
या घटनेनंतर जखमी सायलीने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिने आरोप केला की, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असले तरी, त्याच्यावर कडक कलमे लावण्यात आलेली नाहीत. गुन्हा दाखल करूनही तपासात दिरंगाई होत असून आरोपीला कोणाचे तरी पाठबळ मिळत असल्याची भीती तिने व्यक्त केली. “न्याय मिळण्याऐवजी मला पोलिसांच्या भूमिकेमुळे असुरक्षित वाटत आहे,” अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला.

वादाचे मुख्य कारण
मिळालेल्या माहितीनुसार, राहुलला घटस्फोट हवा नव्हता. याच कारणावरून तो सायलीवर दबाव टाकत होता. या वादाचे रूपांतर शेवटी हिंसक हल्ल्यात झाले. खडकी पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पीडितेच्या आरोपांनंतर पोलीस आता काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!