इंदापूर : प्रतिनिधी
शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2025-26 च्या 25 व्या ऊस गळीत हंगामामध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत 1 लाख मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण केले, अशी माहीती कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली. उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नातून आणि कष्टातून कारखान्याने ऊस गाळपाचा 1 लाख मे. टनाचा पल्ला अल्पावधीतच पार केला आहे.
उच्चांकी क्षमतेने ऊसाचे गाळप
कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साथीने गाळप क्षमता प्रतिदिनी 3500 मे. टनवरून प्रतिदिनी 5500 ते 5700 मे. टन या उच्चांकी क्षमतेने ऊसाचे गाळप सुरू केले आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती, इथेनॉल आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्पामधून कार्यक्षमतेने उत्पादन सुरू आहे. चालू हंगामामध्ये कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचेही अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड.कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ, अधिकारी उपस्थित होते.


