Nitish Kumar Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी नितीश कुमार यांनी विक्रमी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या नवीन मंत्रिमंडळात एकूण 26 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतली. सोहळ्याला अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
कोण कोण झाले मंत्री?
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह नव्या सरकारमध्ये २६ जणांचा समावेश आहे. त्यात जेडीयू आणि भाजप या प्रमुख घटकांसोबतच इतर सहकारी पक्षांनाही प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. विजय चौधरी, विजेंद्र यादव, श्रवण कुमार, मंगल पांडे, दिलीप जयस्वाल, अशोक चौधरी, लेशी सिंग, मदन सहनी, सुनील कुमार, जामा खान, संजय सिंग टायगर, अरुण शंकर, सुरेंद्र मेहता, नारायण प्रसाद, रामा निषाद, लखेंद्र कुमार रोशन, श्रेयसी सिंग, प्रमोद कुमार, संजय कुमार, दीपक प्रकाश यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
हेही वाचा – Bihar Election : बिहारमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर?
कोणत्या पक्षाला किती जागा?
नवीन सरकारमधील एनडीए घटकांमध्ये खालीलप्रमाणे वाटप झालं आहे :
- भाजप : १७ मंत्रीपदे (उपमुख्यमंत्री पदांसह)
- जेडीयू : १५ मंत्री
- एलजेपी (रामविलास पासवान गट) : २ मंत्री
- एचएएम (जीतनराम मांझी) : १ मंत्री
- आरएलएम (उपेंद्र कुशवाह) : १ मंत्री
सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी भाजप कोट्यातून पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
जेडीयूचा भर जुन्या आणि अनुभवी चेहऱ्यांवर
जेडीयूच्या सूचीमध्ये पूर्वी मंत्री राहिलेले आणि अनुभवी नेते आघाडीवर होते. विजय चौधरी, बी.पी. यादव, श्रवण कुमार, लेशी सिंग, अशोक चौधरी, मदन सहनी यांची निवड अपेक्षित असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते आणि अखेर त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळाले. बिहारच्या राजकारणात सतत बदलणाऱ्या समीकरणांमध्ये नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळाला प्रशासन, रोजगार आणि कायदा-सुव्यवस्था यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.


