Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आयुष्याला मिळाला यू टर्न; घरी अंत्यविधीच्या साहित्याची जमवाजमव सुरू असतानाच रुग्णवाहिकेच्या धक्क्यामुळे मृत पांडूतात्या पुन्हा झाले जिवंत

आयुष्याला मिळाला यू टर्न; घरी अंत्यविधीच्या साहित्याची जमवाजमव सुरू असतानाच रुग्णवाहिकेच्या धक्क्यामुळे मृत पांडूतात्या पुन्हा झाले जिवंत

कसबा बावडा: पांडूतात्या उलपे मळधातील शेतात दिवसभर राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे… रात्री चार घास सुखाचे खाऊन येथील ज्ञानेश्वर मंदिरात भजनात दंग होणारे एक सर्वसामान्य वारकरी व्यक्तिमत्त्व. पंधरा दिवसांपूर्वी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक पांडूतात्यांना दरदरून घाम सुटला आणि पांडूतात्या दारात असलेल्या खाटेवर निपचित पडले. अडाणी बायको अस्वस्थ झाली. तिने आरडाओरड सुरू केली. शेजारीपाजारी जमा झाले. त्यांनी पांडूतात्यांना तसेच उचलून गाडीतून कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात नेले.

डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पांडूतात्या यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल. पण गॅरंटी अजिबात देऊ शकत नाही, असे सांगितले. पांडुतात्यांच्या घरी मिळवते कोणीच नाही. एकमेव विवाहित मुलगी… त्यामुळे हॉस्पिटलचा विनाकारण खर्च होण्यापेक्षा सरकारी दवाखान्यात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पांडूतात्यांची हालचाल सायंकाळी सात वाजल्यापासून जवळपास बंदच होती. एव्हाना रात्रीचे दहा वाजून गेले होते. दवाखान्यात असणाऱ्या नातेवाईकांनी आशाच सोडली होती. पै-पाहुण्यांना फोन झाले. पांडूतात्यांना घरी आणत आहोत. तयारीने या, असे सगळ्यांना सांगितले. पांडूतात्यांच्या घरीसुद्धा अंत्यविधीच्या साहित्याची जमवाजमव सुरू झाली. शववाहिनीलाही तयारीसाठी फोन झाला.

पांडूतात्यांना रुग्णवाहिकेतून सगळ संपलं म्हणून घरी आणण्यात येत होतं. बायकोने घरी हंबरडा फोडला होता. शेजारीपाजारी जमा झाले होते. रुग्णवाहिका कसबा बावड्यात पोहोचली आणि पांडूतात्यांच्या हाताची हालचाल जाणवली, रुग्णवाहिकेतील सोबत असणाऱ्यापैकी एकाने हालचाल टिपली आणि तो आश्चर्याने ओरडलाच, पांडूतात्या जिवंत हाईत, रुग्णवाहिकेने लगेच यू-टर्न घेत डी. वाय. पाटील हॉस्पिटल गाठले आणि येथेच पांडूतात्यांच्या जीवनाला यू टर्न मिळाला. हॉस्पिटलमध्ये पांडूतात्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवसापासून पांडूतात्या हळूहळू उपचाराला प्रतिसाद देऊ लागले. पांडूतात्यांवर हृदय शस्त्रक्रियेचे उपचार करण्यात आले. आज पांडूतात्या खणखणीत बरे झाले आहेत.

स्वतः व मरण पाहून तात्या पुन्हा आपल्या घरी आले आहेत. पांडूतात्याचे नातेवाईक व शेजारीही आनंदित झाले. पासष्ठ वर्षाचा पांडूतात्या अर्थात पांडुरंग रामा उलपे हे आता बरे झालेत, पण त्यांना गरज आहे विश्रांतीची… शेजाऱ्यांनी, पै पाहुण्यांनी, बघायला येणाऱ्या जवळच्या लोकानी आता पांडूतात्याच्या तब्येतीला पूर्ण सुधारण्यासाठी त्यांना आराम देण्याची गरज आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!