Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जेलमधून सुटल्यावर पुन्हा माजवली दहशत; येरवड्यात वाहनांची तोडफोड करणारा गुंड अटकेत

जेलमधून सुटल्यावर पुन्हा माजवली दहशत; येरवड्यात वाहनांची तोडफोड करणारा गुंड अटकेत

पुणे: दहशत माजवण्यासाठी वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडाला येरवडापोलिसांनीअटक केली. समीर शब्बीर शेख (27, रा. जयजवाननगर, येरवडा), असे अटक केलेल्याचे नाव आहे. शेख हा सराईत असून, त्याच्याविरोधात यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली होती.

मकोका कारवाईत न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर झाल्यानंतर तो पुन्हा येरवडा भागात आला. त्याने दहशत माजवण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्याची नुकतीच घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. शेख याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. पसार झालेला शेख हा लोहगाव भागात मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अमोल गायकवाड यांना खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून शेख याला पकडले. दहशत माजवणे, तसेच एकाबरोबर झालेल्या भांडणातून वाहनांची तोडफोड केल्याची कबुली त्याने दिली.

परिमंडळ 4चे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक विजय फटांगरे, प्रदीप सुर्वे, महेंद्र शिंदे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, नटराज सुतार, अतुल जाधव, अक्षय शिंदे आणि संदीप जायभाय यांनी ही कामगिरी केली.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!