Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Oppo चा नवा A6x 5G स्मार्टफोन लाँच; 6500mAh बॅटरीसह अनेक बेस्ट फीचर्स, किंमत..

Oppo चा नवा A6x 5G स्मार्टफोन लाँच; 6500mAh बॅटरीसह अनेक बेस्ट फीचर्स, किंमत..

नवी दिल्ली : सध्या Samsung, Realme, Redmi यांसारखे स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात Oppo ने आता नवा कोरा Oppo A6x 5G भारतात लाँच केला आहे. हा Oppo ब्रँडचा बजेट फोन असणार आहे, जो मोठ्या बॅटरीसह येतो. तुम्ही हा फोन तीन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये खरेदी करू शकता. हँडसेटला पॉवर देणारी 6500mAh बॅटरी 45W चार्जिंग सपोर्टसह मिळत आहे.

स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6000 सीरीज प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 13MP चा मुख्य रिअर कॅमेरा आहे. हा फोन अलीकडेच लाँच झालेल्या Realme C85 5G सारख्या फोनशी थेट बरोबरी करणार आहे. Oppo A6x 5G चा बेस व्हेरिएंट 12499 मध्ये येतो. ही किंमत 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. त्याच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13499 आहे. हँडसेटचा टॉप व्हेरिएंट 6GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत १४९९९ रुपये आहे.

तुम्ही हा फोन तीन महिन्यांच्या No Cost EMI वर खरेदी करू शकता. हँडसेट दोन रंगांच्या पर्यायांमध्ये मिळत आहे. त्यातील एक आइस ब्लू आणि ऑलिव्ह ग्रीन हा पर्याय आहे. तर तुम्ही हा फोन अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!