Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

SBI ने बंद केली ‘ही’ सुविधा; लाखो खातेदारांच्या अडचणीत पडणार भर?

SBI ने बंद केली ‘ही’ सुविधा; लाखो खातेदारांच्या अडचणीत पडणार भर?

नवी दिल्ली : नवीन महिना अर्थात डिसेंबर महिना सुरु झाला आहे. त्यामुळे अनेक मोठ्या बदलांची सुरुवात देखील झाली आहे. बँकिंग सेवांपासून ते रेल्वे आणि हवाई प्रवाशांपर्यंत सर्वांवर होणार आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयने त्यांची एक सेवा (एसबीआय एमकॅश) बंद केली आहे. डिसेंबर महिना काही विशिष्ट कारणांसाठी खास आहे, कारण त्यांची अंतिम मुदत या महिन्यात संपणार आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने १ डिसेंबरपासून काही बदल देखील लागू केले आहेत आणि याचाच एक भाग म्हणून, त्यांनी त्यांची एमकॅश सेवा (एसबीआय एमकॅश सेवा बंद) बंद केली आहे. ही सेवा वापरणारे एसबीआय ग्राहक आता एमकॅश लिंकद्वारे पेमेंटचा दावा करू शकणार नाहीत. बँकेने आपल्या ग्राहकांना या संदर्भात माहिती दिली आहे. त्यात अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आले.

बँक खातेदारांना UPI, IMPS, NEFT आणि RTGS सारखे सुरक्षित पर्याय वापरण्याचा सल्ला दिला आहे. SBI mCash ही स्टेट बँकेची त्वरित मनी ट्रान्सफर सेवा होती, जी खाते क्रमांक किंवा IFSC प्रविष्ट न करता मोबाईल नंबरवर पैसे पाठवण्याची मुभा देत होती. मात्र, आता ही सेवा नवीन महिन्यापासून बंद केली जाणार आहे. याचा फटका लाखो खातेदारांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!