पुणे : महाराष्ट्र शासनाच्या रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ८ डिसेंबर २०२५ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर, नागपूर येथे प्रकल्प सल्लागार यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प सल्लागार.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– वेतन / मानधन : दरमहा 30000
– वयोमर्यादा : 45 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई- मेल).
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : admn-mrsac@mrsac.gov.in
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : ८ डिसेंबर २०२५.
– मुलाखतीचा पत्ता : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर, व्हीएनआयटी कॅम्पस, साउथ अंबाझरी रोड, नागपूर-४४००१०.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.mrsac.gov.in/या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


