Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुन्हा शरद पवारांचा पक्ष फोडण्यासाठी अजितदादांच्या पडद्यामागे हालचाली, सुनील तटकरेंनी सात खासदारांना संपर्क करून ऑफर दिल्याची चर्चा

पुन्हा शरद पवारांचा पक्ष फोडण्यासाठी अजितदादांच्या पडद्यामागे हालचाली, सुनील तटकरेंनी सात खासदारांना संपर्क करून ऑफर दिल्याची चर्चा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पक्षातील खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या सात खासदारांना संपर्क केल्याची माहिती मिळत आहे. या खासदारांची भेट घेऊन सोबत येण्याची ऑफर तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान संपर्क झालेल्या सर्व सातही खासदारांनी सुनील तटकरे यांच्या ऑफर नकार दिल्याची माहिती देखील आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी खासदार प्रफुल पटेल यांना फोन करत तटकरे यांनी केलेल्या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार यांच्या पक्षातील खासदारांना आपल्याकडे वळवण्याची जबाबदारी ही अजित पवार यांच्याकडून सुनील तटकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे.त्याचाच एक भाग म्हणून सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे वगळता इतर सात खासदारांची भेट घेत त्यांना अजित पवारांसोबत येण्याची ऑफर दिली. तुम्ही सत्तेसोबत या, असे सुनील तटकरे यांनी या खासदारांना सांगितले. या भेटी स्वतंत्रपणे घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या भेटी आणि ऑफरबाबतची माहिती तुम्ही इतर कोणाला देऊ नका, असेही तटकरेंनी खासदारांना सांगितले. मात्र या सातही खासदारांनी या भेटीची माहिती शरद पवारांना आणि सुप्रिया सुळे यांना दिली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांना फोन करून याप्रकरणी नाराजी व्यक्त केली. पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का? अशी थेट विचारणा सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांच्याकडे केल्याची माहिती मिळत आहे. या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांची ऑफर धुडकावल्याची माहिती आहे. एनडीए सरकारला अधिक स्थिरता मिळावी, यासाठी या सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!