नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजी झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यात फोन नंबरवरून कोणाला माहिती कळू शकते? जर तुम्हाला असे वाटत असेल, तर एक अशी वेबसाईट जी तुम्हाला चांगले रिझल्ट देऊ शकते. ‘प्रॉक्सीअर्थ’ नावाची ही वेबसाईट फक्त एका फोन नंबरचा वापर करून युजर्सचे ठिकाण आणि इतर वैयक्तिक माहिती उघड करू शकते.
ही वेबसाईट फक्त फोन नंबर टाकून युजर्सचे नाव, ई-मेल पत्ता आणि इतर वैयक्तिक माहिती उघड करते. ही वेबसाईट युजर्सचे ठिकाण उघड करण्याचा दावा देखील करते. या वेबसाईटची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली. वेबसाईट अजूनही चालू आहे आणि ती वर्किंगमध्ये असल्याची माहिती दिली जात आहे. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला फक्त फोन नंबर टाकायचा आहे, जो तुम्हाला त्याच्याशी संबंधित सर्व तपशील देऊ शकेल. मात्र, हे तुम्हाला सर्व नंबरसाठी डेटाची माहिती देणार नाही.
कधीकधी हा डेटा जुना असतो. परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही वेबसाईट तुमचा डेटा कुठूनही मिळवू शकते. राकेश असे या वेबसाईट डेव्हलपरचे नाव आहे. त्याची अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंट आहेत, जिथे त्याने विविध माहिती शेअर केली आहे. त्याने युजर्सचा कोणताही डेटा लीक केलेला नाही, परंतु वेगवेगळ्या वेळी लीक झालेला डेटा गोळा केला आहे. त्यामुळे तुम्हाला ती माहिती मिळवता येत आहे.


