Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dipali Patil Case: नृत्यांगना दिपाली पाटील प्रकरणी मोठी अपडेट; भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक

Dipali Patil Case: नृत्यांगना दिपाली पाटील प्रकरणी मोठी अपडेट; भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक

Dipali Patil Case: अहिल्यानगरच्या जामखेड येथील कला केंद्रावर काम करणारी नृत्यांगना दिपाली पाटील हिने एका लॉजवर जाऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ माजली आहे. दिपाली ही मूळची कल्याणची आहे. तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी भाजपाच्या नेत्याला अटक केली आहे.

जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटीलने स्वत:ला संपवले. तिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत संदीप गायकवाड याची पत्नी लता संदीप गायकवाड यांनी भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी केली आहे. हे दोघेही पती-पत्नी माजी नगरसेवक आहेत.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

दिपाली पाटीलच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दीपाली पाटीलसा संदीप गायकवाड हा लग्नाचा तगादा लावत असल्यानेच तिने आत्महत्या केल्याचे आरोप नातेवाईकांनी फिर्यादीत केला आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

दिपाली पाटील ही काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली होती. परंतु अनेक तास उलटूनही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. दिपाली ज्या रिक्षाने गेली त्या रिक्षा चालकाची चौकशी केली असता, त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले. मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता रूम आतून लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलवला. आता या प्रकरणी भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!