PMC Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. काही जागांवर मतदान स्थगित राहिले होते, त्या जागांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार असून, २१ डिसेंबरला निकाल जाहीर होईल. यानंतर किंवा त्याच सुमारास पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी पुढील निवडणुकीसाठी तयारीला गती दिली आहे.
पुण्यातील नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश
पुण्यातील राजकीय परिस्थितीत नव्याने बदल घडवणारी घटना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अनेक महत्त्वाचे नेते सामील झाले आहेत. यामध्ये माजी नगरसेवक सुनील गोगले, भाजपचे अक्षय भोसले, भारती मिसाळ (मातंग एकता आंदोलन), राजेश परदेशी (क्रांतिवीर झोपडपट्टी संघटना) आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रवण केकाण यांचा समावेश आहे. या नेत्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पक्षात प्रवेश करत “मशाल” हातात घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, शिवसेना संघटक वसंत मोरे, पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवेशामुळे पक्षाची पुण्यातील ताकद वाढणार आहे.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील गोगले, भाजप माथाडी पुणे शहर उपाध्यक्ष अक्षय भोसले, मातंग एकता आंदोलनाच्या भारती मिसाळ, क्रांतिवीर झोपडपट्टी संघटनेचे राजेश परदेशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रवण केकाण ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)… pic.twitter.com/G0RBjUksB1
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 6, 2025
हेही वाचा –UBT vs BJP : वरळीत ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा; नेमकं काय घडलं?
महानगर पालिका निवडणुकीची तयारी सुरू
निवडणूक आयोग सध्या मतदार याद्यांची पडताळणी आणि दुरुस्ती करत असून, लवकरच पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख पक्षांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे आणि आगामी काळात आणखी नेते पक्षात सामील होऊ शकतात.


