Today शनिवार, 19th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

UBT vs BJP : वरळीत ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा; नेमकं काय घडलं?

UBT vs BJP : वरळीत ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा; नेमकं काय घडलं?

UBT vs BJP : वरळी परिसरातील ‘सेंट रेजिस’ हॉटेलमध्ये गुरुवारी संध्याकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत तीव्र चकमक झाली. कामगार युनियनच्या वादातून सुरू झालेला हा संघर्ष अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे सुटला. घटनेला सुरुवात झाली ती ठाकरे गटाच्या कामगार युनियनमधील काही सदस्यांनी भाजपच्या अखिल भारतीय कर्मचारी संघात प्रवेश केल्याने. या हालचालीचा निषेध करत भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि दोन्ही बाजूंतील कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. घोषणाबाजी आणि ढकलाढकलीच्या वातावरणात तणाव वाढत असतानाच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दोन्ही पक्षांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप 

संघर्षानंतर दोन्ही पक्षांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांचा वर्षाव केला. ठाकरे गटातील कार्यकर्ते टिकत नाहीत, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून देण्यात आली. तर मनमानी फोडाफोडीला आम्ही बिलकूल मान्यता देणार नाही, असा स्पष्ट इशारा भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

हेही वाचा – Mangalprabhat Lodha : ‘भाजप देवाभाऊमय, इतर राज्यातील पक्षही फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात’; मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सेंट रेजिसमध्ये त्यांची युनियन आधीपासून अस्तित्वात असून नव्या सदस्यांशी संपर्क राखण्यासाठी आणि बोर्ड लावण्यासाठी ते आले होते. ‘आम्ही शांततेत काम करत होतो. ठाकरे गटातील काही जणांनीच विनाकारण गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. भाजपने कुठेही संघर्षाचा मार्ग स्वीकारलेला नाही,’ असे एका पदाधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा – ‘शिवसेना को हराना नामुमकिन है’; बदलापूरात एकनाथ शिंदेंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया 

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची चेतावणी दिली. कामगारांना कोणत्याही युनियनमध्ये सामील होण्याचा संविधानिक अधिकार आहे. सर्वांनी एकमेकांना काम करण्याची मोकळीक द्यावी, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!