Advocate General Birendra Saraf Resigns: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत राज्य मंत्रिमंडळाच्या आज नागपूर येथे झालेल्या बैठकीत श्री बीरेंद्र सराफ यांचा महाधिवक्ता पदाचा राजीनामा स्वीकृत करण्यात आला. त्यांनी महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गुणगौरव यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि अन्य मंत्री यावेळी उपस्थित होते.
बिरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे सांगितले. राज्य सरकारकडून पुढील व्यवस्था होईपर्यंत त्यांना काम पाहण्याची विनंती करण्यात आली होती. सरकारच्या विनंतीचा मान देऊन त्यांनी आतापर्यंत कामकाज पाहिले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत साठे यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मिलिंद साठे यांचा विधि क्षेत्रातला अनुभव अतिशय दांडगा आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी अनेक वर्षे वरिष्ठ वकील म्हणून काम केले. त्यांच्या नियुक्तीचा राज्य सरकारला फायदा होईल, अशी मंत्रिमंडळात चर्चा झाली. चर्चेअंती त्यांच्या नावावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.
याचवेळी राज्याचे नूतन महाधिवक्ता म्हणून श्री मिलिंद साठे यांच्या नियुक्तीला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. श्री मिलिंद साठे यांनी मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात अनेक खटल्यांमध्ये काम पाहिले आहे. राज्य सरकारच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ म्हणून त्यांनी अनेक प्रकरणात काम पाहिले आहे.
कायदेविषयक अनेक विषयांवर त्यांनी विपुल वृत्तपत्रीय लेखन केले आहे. त्यांच्या महाधिवक्ता म्हणून नियुक्तीबद्दल मंत्रिमंडळाने त्यांना शुभेच्छा दिल्या.


