सोलापूर : होम मैदानावर मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ४२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नरेंद्र गुडशेलू (वय ४२, रा. सुरेश नगर, कुमठा नाका, सोलापूर) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
मंगळवारी (९ डिसेंबर) सायंकाळी ५.३० वाजता ही हृदयद्रावक घटना घडली. नरेंद्र मित्रांसोबत क्रिकेट खेळत होते. बॅटिंग करताना अचानक त्यांना जोरदार चक्कर आली आणि ते मैदानावरच कोसळले. मैदानावर उपस्थित मित्रांनी तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
डॉक्टरांच्या मते, हृदयविकाराचा झटका हा मृत्यूचे कारण असण्याची शक्यता आहे. नरेंद्र यांना यापूर्वी हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता, असे कुटुंबीयांनी सांगितले. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
धुळ्यात पतंग उडवताना विद्यार्थ्याचा मृत्यू
मकरसंक्रांतीच्या तोंडावर पतंग उडवण्याच्या नादात एका १२ वर्षीय चिमुकल्याचा तीन मजली इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. रक्षित प्रभाकर पाटील (वय १२) असे मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी रक्षित हा शाळेत जाण्यासाठी घरातून निघाला होता.
मात्र, तो जवळच असलेल्या बांधकामाधीन तीन मजली इमारतीवर पतंग उडवायला गेला. इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्या दिवशी मजूर कामावर नव्हते. रक्षित एकटाच तिसऱ्या मजल्यावर गेला आणि पतंग उडवताना तो असंतुलित होऊन खाली कोसळला. जागीच त्याचा मृत्यू झाला.


